अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- राज्यात कोठेही असा सामुदायिक विवाह सोहळा झाला नाही. असा शाही सामुदायीक विवाह सोहळा आपण १० मार्चला करणार आहोत. त्याच बरोबर अनेक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीस परवानगी मिळाली आहे.(Wedding ceremony)
शेतकऱ्यांच्या लढ्याला य़श आले आहे. त्यामुळे राज्यात पहिली बैलगाडा बैलगाडा शर्यत पारनेरला घेऊ असे आमदार निलेश लंके म्हणाले.
पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य कृषीगंगा प्रदर्शनाचे आयोजन केले आहे त्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी आमदार लंके बोलत होते.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांबरोबरच अनेक उद्योग व्यावसायिकांना आपले उत्पादन थेट ग्राहकांना विकण्याची संधी. तर ग्राहकांना कमी दरात थेट कंपणीचा माल विकत मिळणार आहे.
आपण गेली तीन वर्षापासून पारनेर येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवित आहोत गत वर्षी कोरोनामुळे प्रदर्शन भरविता आले नाही. देशातील जनतेचा खरा कैवारी शेतकरी आहे. त्यांच्यासाठी आपण काही तरी दिले पाहीजे हाच या मागचा खरा उद्देश आहे.