Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये काहींनी बंडखोरीचा झेंडाच हातात घेतल्यामुळे त्या त्या पक्षांपुढील डोकेदुखी मात्र वाढलेली आहे.
बंडखोरांना शांत करण्यासाठी किंवा त्यांचे मन वळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न पक्षांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. त्यातच आपण पारनेर मतदारसंघाचा विचार केला तर पारनेर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला उमेदवारी देण्यात आली व ठाकरे गटाला मात्र या ठिकाणाहून वगळण्यात आले.
इतकेच नाहीतर श्रीगोंदा मतदारसंघांमधून देखील नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली व नगर शहरात देखील ठाकरे गटाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता दिसून येत नसल्यामुळे जिल्ह्यात शिवसैनिकांच्या अस्तित्वच धोक्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाचे व शिवसैनिकांचे अस्तित्व टिकून राहावे याकरिताच पारनेर मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळाले नाही तरी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले लढणार अपक्ष निवडणूक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या जागा वाटपात पारनेर मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाली व राणी लंके यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. अशा पद्धतीने पारनेर मतदारसंघातून देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वगळण्यात आले.
असेच काहीसी परिस्थिती श्रीगोंदा मतदारसंघात देखील दिसून आली. तसेच अहिल्यानगर शहरातून देखील उद्धव सेनेला उमेदवारी मिळेल अशी अजिबात शक्यता दिसून येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांचे अस्तित्वच धोक्यात आले असून हे अस्तित्व टिकवणे खूप गरजेचे असल्यामुळे पारनेर मतदार संघातून पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष उमेदवारी करणारच असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी स्पष्ट केले व बंडाचा झेंडा फडकवला.
पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये अहिल्यानगर तालुक्यातील शिवसैनिकांची विचार बैठक पार पडली संदेश कार्ले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केले. या बैठकीला पंचायत समिती माजी सभापती प्रवीण कोकाटे तसेच माजी सभापती रामदास भोर, पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे,
माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे,माजी उपसभापती दिलीप पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना संदेश कार्ले म्हणाले की खासदार निलेश लंके यांना आमदार आणि खासदार करण्यामध्ये शिवसेनेचा खूप मोठा वाटा होता
परंतु तरीदेखील निलेश लंके यांनी शिवसेनेला उमेदवारी मिळवून देण्यासाठी कुठलेही प्रयत्न न करता काढता पाय घेतला. त्यामुळे आता नगर शहर व तीनही मतदार संघामध्ये शिवसेना जिवंत ठेवणे खूप गरजेचे असल्यामुळे अर्ज भरणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही तर पारनेर मधून डॉ. श्रीकांत पठारे देखील अर्ज भरणारआहेत.