Ahmednagar Leopard : गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील शिरसगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. येथील शिरसगाव भागात गेल्या महिनाभरापासून २ बिबट्यांचा वावर होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत होती.
पिंजरा लावण्याची वनविभागाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानंतर चांगदेव बकाल व किशोर बकाल यांच्या ऊसाच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यामध्ये बिबट्यासाठी भक्ष ठेवण्यात आले हाते.
या भक्षाच्या शोधात बिबट्या सोमवारी (दि.४) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात अलगद अडकला. मात्र त्याच्यासोबतचा दुसरा बिबट्या अद्याप बाहेर असल्याने आणखी एक पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रात्री उशिरा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.