अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील दूधदराची ठिणगी आता ‘राज्य पेटवणार’ ! आजपासून राज्यभरात होणार असे काही …

Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला दूध दराचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. अनेक शेतकरी संघटनांच्या माध्यमातून दूध दराच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पावसाळी अधिअवेशनातही दूध दराचा प्रश्न गाजला. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अद्याप निर्णय झाला नाही.

यापूर्वीच शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते. आता आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनाच्या या टप्प्यामध्ये १५ जुलै ते २१ जुलै या आठवडाभराच्या कालावधीमध्ये राज्यभर स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलने करण्याची हाक दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. तसा निर्णय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला.

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान कृषी संवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला प्रति लिटर ३० रुपये व ५ रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

मात्र शेतकऱ्यांनी अनुदान नको आम्हाला आमच्या कष्टाचे दाम द्या, अनुदान नको. तसेच भाविष्यात जर सरकार बदलले तर दुसरे सरकार अनुदान बंद करेल अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघाच्या प्रतिनिधी आणि शेतकरी संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर देण्याची मागणी केली.

मात्र सहकारी व खासगी दूध उत्पादक संघाच्या प्रतिनिधीकडून ही मागणी फेटाळून लावत ४० काय मागता ३० रुपयेसुद्धा शेतकऱ्यांच्या दुधाला देऊ शकत नाहीत. असे सांगत हि मागणी फेटाळून लावली होती.

या पार्श्वभूमीवर आता दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून (१५ जुलै ते २१ जुलै दरम्यान) आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे.

या आंदोलनात धरणे आंदोलने, दुग्धाभिषेक, दूध हंडी, दूध परिषदा, मोटारसायकल रॅली, पायी दिंडी, निदर्शने, लोकप्रतिनिधींच्या भेटी, लाक्षणिक उपोषणे व रास्ता रोकोच्या माध्यमातून पुढील संपूर्ण आठवडाभर राज्यातील ठिकठिकाणी आंदोलन करत दूध उत्पादक आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार आहेत.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची ऑनलाइन बैठक रविवारी पार पडली. या बैठकीमध्ये राज्यभरातील ४७ प्रमुख नेते, कार्यकर्ते व विचारवंतांनी सहभाग नोंदवला. या बैठकीत डॉ. अजित नवलेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आठवडाभर चालणाऱ्या या तीव्र आंदोलनाची व मागण्यांची दखल जर सरकारने घेतली नाही, तर सर्व राज्यभरातील ताकद एकत्र करून मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts