अहमदनगर बातम्या

क्रीडा विभागाकडून खेळाडूंचे बोगस प्रमाणपत्र शोध मोहीम हाती ..! क्रीडामंत्री बनसोडे यांनी दिली माहिती

Ahmednagar News : क्रीडा मंत्रालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे लवकरच क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिक भवनही उभारले जाणार आहे. ऑलिंपिक सुवर्णपदक खेळाडूसाठी एक कोटी रुपये, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपये दिले जाणार आहे, तसेच सांघिक व सहभागी खेळाडूंसाठी दहा लाख रुपये देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंचे बोगस प्रमाणपत्र शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी वाडिया पार्क क्रीडा संकुलनाची पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, क्रीडा अधिकारी दिघे, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री बनसोडे म्हणाले की,वाडिया पार्क क्रीडा संकुल हे जिल्ह्याच्या दृष्टीने खेळाडूंसाठी महत्त्वाचे मैदान आहे, या मैदानाच्या सुविधेसाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असून जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवावे, आमदार संग्राम जगताप हे कर्तव्यदक्ष आमदार असून त्यांच्या माध्यमातून जेवढ्या निधीचे प्रस्ताव येतील तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

या ठिकाणी तात्काळ लाईटची सुविधा तसेच खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, वाडिया पार्क क्रीडा संकुल हे भव्य दिव्य असून या ठिकाणी नगर जिल्ह्यातील खेळाडू आपले करिअर करू शकतात यासाठी क्रीडा विभाग नक्कीच मदत करेल, वाडिया पार्क क्रीडा संकुल मधील खेळाच्या सुविधेसाठी मोठा निधी देणार तसेच विविध क्रीडा संघटनेचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts