अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- वेळेत उपचाराची सुविधा न मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील एका आदर्श शिक्षकाला आपला जीव गमावावा लागला आहे.
प्राध्यापक भगीरथ एकनाथ कणसे पाटील (वय 63 वर्ष) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एका शिक्षण संस्थेतील रिटायर्ड शिक्षक भगीरथ एकनाथ कणसे पाटील (वय 63 वर्ष) यांना छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांनी लोणी येथील रुग्णालयात उपचार घेतला,
तिथे त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. उपचारानंतर ते श्रीरामपूर घरी आले. दुसर्या दिवशी पुन्हा रात्री त्रास होवू लागल्याने रुग्णालयात गेले. मला करोना नाही, प्राथमिक उपचार तरी करा, अशी विनंती केली, इथे सुविधा नसल्याने संगमनेरला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
अॅम्बुलन्सअभावी ते रिक्षातून दुसर्या खासगी रुग्णालयात गेले, पण तिथेही उपचार मिळाले नाही. त्यानंतर प्रवरा हॉस्पिटलमध्ये गेले पण या एक ते दीड तासाच्या प्रवासादरम्यान त्यांचे निधन झाले. केवळ प्राथमिक उपचार न मिळाले असते तर या आदर्श शिक्षकांचे प्राण वाचले असते.