Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध करणे अवघड झाले असताना
महाराष्ट्र सरकारच्या समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करावे, अशी मागणी करीत संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
संगमनेर बसस्थानक येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन झाले. यावेळी बाबासाहेब ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, लक्ष्मणराव कुटे,
सुरेशराव थोरात, निर्मलाताई गुंजाळ, रामहरी कातोरे, सुभाष सांगळे, राजेंद्र गुंजाळ, संतोष हासे, विलास कवडे, नवनाथ आरगडे, राजेंद्र चकोर, रोहिदास पवार, बाळासाहेब गायकवाड, गजेंद्र अभंग, आनंद वर्षे, विलास नवले,
हृतिक राऊत, भाऊसाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, विक्रम थोरात, डॉ. तुषार दिघे, प्रमोद हासे, बापूसाहेब गिरी, प्रा. बाबा खरात, अर्चनाताई बालोडे, पद्माताई थोरात, तात्याराम कुटे, मीनानाथ वर्षे, जावेद शेख, नाना वाघ, सुनील कडलग, राजेंद्र कडलग आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र जल संपत्ती नियमन कायदा २००५ हा प्रामुख्याने दुष्काळी भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना समन्यायीपणे पाणी वाटप होण्याच्या उद्देशाने झालेला आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातील कार्यक्षेत्रात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने या परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा ही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना कायद्याच्या चुकीचा अर्थ काढून भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडी धरणासाठी नेणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत ५ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात व १२ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणी बाकी असतानाच पाणी सोडले आहे.
समन्यायीला संगमनेरचा प्रथम विरोध
समन्यायी पाणी वाटप कायद्याचे जे सूत्र आहे, ते चुकीच्या पद्धतीने राबवले जात असल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांनी या कायद्याला सातत्याने विरोध केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात संगमनेरमध्येच पहिले आंदोलन झाले होते. आता कायदेशीर लढाई लढली जात असल्याचे बाबा ओहोळ यांनी सांगितले आहे.