अहमदनगर बातम्या

युवक रात्रीच्या वेळी स्कॉपिओ घेऊन बाहेर पडला; पोलिसांनी पकडला, कारण…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- रात्रीच्या वेळी स्कॉपिओ घेऊन फेरफटका मारायला निघालेल्या युवकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. अहमदनगर शहरातील सबजेल चौकात ही घटना घडली.

शिव आण्णासाहेब सोनवणे (वय 19 रा. रंगभवन, सर्जेपुरा) असे पकडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार श्रीकांत खताडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी त्याची स्कॉपिओ ताब्यात घेतली आहे. गुरूवारी रात्री ‘जगने की रात’ साठी कोतवाली पोलीस बंदोबस्तावर होते.

रात्री 12 वाजेच्या सुमारास कापडबाजार येथे स्कॉपिओ (एमएच 16 एबी 0519) सर्जेपुराकडून भिंगारवाला चौकाकडे भरधाव वेगात येत असताना

त्याला पोलिसांनी थांबवले. तो न थांबल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पुढे त्याला सबजेल चौकात नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts