अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेला युवक पुन्हा घरी परत आणा नसल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गोपाल भिम यादव (वय 23 रा. लक्ष्मीनगर, लिंक रोड, केडगाव) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी मनिषा यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
बेपत्ता झालेला गोपाल हा अंदाजे 23 वर्षे वयाचा असून रंग सावळा, उंची सहा फुट, शरीरबांधा सडपातळ, डोक्याचे केस वाढलेले, नाक परसट, अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, पांढर्या रंगाची पॅन्ट, पायात सॅन्डल असे वर्णन असलेल्या युवकाविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस हवालदार बी. एम. इखे यांनी केले आहे.