Ahmednagar News : महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथे रविवारी (दि.१ सप्टेंबर) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला भाजप आमदार नितेश राणे उपस्थित होते.
दरम्यान या रॅलीत त्यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर वातावरण पुन्हा तापायला लागले. अखेर पोलिसांनी रविवारी रात्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
नेमके काय म्हणाले नितेश राणे?
आपण सर्व असताना रामगिरी महाराज यांच्याकडे कोण वाकड्या नजरेने पाहू शकतो? त्यांनी हिंदूंच्या बाजूने विचार मांडले आहेत. त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर शुक्रवारी नमाज पडू देणार नाही, असा इशारा भाजप नेते आ. नितेश राणे यांनी दिला.
पुढे, आ. राणे म्हणाले, तुम्हाला जे करायचे ते तुमच्या पाकिस्तान, बांग्लादेशात करा. आमच्या हिंदू राष्ट्रात नाही. हा हिंदूंचा देश आहे. स्टेटस ठेवणाऱ्यांना घरात जाऊन मारता का? परत असे घडले दोन पायावर घरी परतणार नाहीत. हिंदूंनी आपली धार दाखविलीच पाहिजे.
आपण ९० टक्के असताना त्यांची हिंमत होती कशी? आम्ही असताना रामगिरी महाराजांना वेगळे पोलिस संरक्षण कशाला हवे? त्यांना धक्का लागल्यास मशिदीत घुसून शोधून शोधून मारू, रामगिरी महाराजांविरोधात बोलाल तर जीभ हासडून देऊ असे ते म्हणाले.
आपटे आणि पठाण…
मालवणमध्ये जी घटना घडली त्याचे कोणी समर्थन करणार नाही. त्या अपटेला अपटल्या शिवाय सोडणार नाही. त्यावर राजकारण करणारे हडपसरमध्ये महाराजांची मूर्ती पठाणने दगडाने ठेचून तोडली, तेव्हा कुठे होते. पठाण आणि आपटेला एकच नियम लावणार, असे आ. राणे म्हणाले.