अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज सकाळपासूनच पोलीस व प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जागेवर कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये कोरोना पॉझिटिव आल्यास या नागरिकाला थेट कोवीड सेंटर मध्ये भरती करण्यात येत असून कोरोना निगेटिव्ह आल्यास दंडात्मक कारवाई प्रशासन करत आहे.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गेल्या दोन दिवसापूर्वी श्रीरामपुरात कोरोना रुग्णसंख्या मोठी वाढली होती.
त्यामुळे आता कोरोनाला आवर घालण्यासाठी प्रशासनालाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. तरी विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासन आता “जागेवर कोरोना चाचणी “ करण्याची कारवाई करणार आहे.
म्हणुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्या हिंडफिर्यानो घरातच बस अन्यथा तुमची रवानगी थेट कोविड केंद्रात होईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.