अहमदनगर बातम्या

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी, इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले

Ahmednagar News : गेल्या दोन-तीन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.. असे असतानाच करंजी गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी, इंजिन असे अनेक शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे अवजारे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

या चोरीच्या प्रकरणांमध्ये येथीलच काही भुरटे चोर सहभागी असल्याचे चोरी झालेल्या शेतकऱ्यांकडून बोलले जात असल्याने या चोरीच्या प्रकरणाची करंजी खंडोबावाडी कान्होबावाडी सातवड परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

करंजी येथील मधुकर अकोलकर, बाळू मोरे, महादेव पवार, रामसिंग चव्हाण अशा अनेक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी इंजीन चोरी जाण्याच्या घटना घडल्या, त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी अस्वस्थता पसरली.

पावसाने ओढ दिल्याने हतबल झालेला शेतकरी त्यातच शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे अवजारे चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

खंडोबावाडी येथुन महादेव पवार यांचे इंजिन चोरीला गेल्यानंतर त्यांनी तात्काळ तिसगाव येथील भंगार खरेदी करणाऱ्या दुकानदारांशी संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी चोरीला गेलेले इंजन भंगार विक्रेत्याकडे भंगारात विकण्यासाठी आल्यानंतर संबंधित दुकानदाराने ही माहिती पवार यांना फोनवरून दिली.

त्याचवेळी संबंधित चोरटे दुकानाजवळच इंजिन टाकून तेथुन पसार झाले. चोरीला गेलेले इंजिनही पवार यांना परत मिळाले असले तरी या इंजन चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल करंजी येथील असल्याचे पुढे आल्याने चोरीच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची अवजारे चोरी करण्याच्या प्रकरणांमध्ये येथील तरुणांचा सहभाग असल्याचे संबंधितांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts