अहमदनगर बातम्या

एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची कर्जतमध्ये अफवा !

Ahmednagar News : एसटी बसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती चालकाला मिळते, जामखेडकडे जाणारी बस कर्जतमध्ये बोथरा एजन्सीसमोर थांबवली जाते, प्रवाशांना खाली उतरवले जाते, तेवढ्यात कर्जतचे पोलीसही तेथे पोहचतात, पोलिसांकडून संपूर्ण गाडीची तपासणी केली जाते व गाडीत कोणताही बॉम्ब नसल्याची खात्री होताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जिल्ह्यातील जामखेड आगाराच्या गाडी नंबर एम एच ४० ए क्यू ६२२४ या गाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दूरध्वणी वरून अज्ञात व्यक्ती कडून एस टी महामंडळाच्या आगाराला मिळते, ही माहिती मिळताच ते तातडीने कर्तव्यावर असलेल्या सदर एस टी बस चालकाला फोन करून गाडीत बॉम्ब असल्याची माहिती देतात व सर्व प्रवाशांना गाडी खाली उतरवून सुरक्षित अंतरावर न्यावे असे सुचवले

त्यानुसार चालक उत्तम क्षीरसागर यांनी आपली जामखेड कडे जात असलेली बस कर्जत मध्ये नगर रोड वरील बोथरा एजन्सी समोर उभी केली व वाहक विनायक गोरे यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना खाली उतरवले, तेवढ्यात कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती मुळुक हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले त्यांनी सर्व गाडीची प्रवाशांची तपासणी केली, मात्र त्या बस मध्ये बॉम्ब अथवा इतर सदृश्य काहीही आढळले नाही.

त्यामुळे पोलिसांनी आपली कारवाई पूर्ण करत प्रवाशांना गाडीत बसवून निरोप दिला. सदर कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले, सदर बस मध्ये बॉम्ब असल्याचा फोन करणाऱ्या इसमास अटक करण्यात आली असून अशा पद्धतीने पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोणीही अशा पद्धतीने खोटी माहिती देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक मारुती मुलुक यांनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts