विनाकारण हिंडफिऱ्यांची होणार अँटीजेन टेस्ट

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील लोक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे.

म्हणून जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणार्‍यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे असा संशय जिल्हा प्रशासनाला आहे.

यामुळे ग्रामीण भागात आता गर्दीच्या ठिकाणी चेक पोस्ट लावून त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांना पकडून त्यांची अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश रविवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण आणि विना परवानगी फिरणार्‍या नागरिकांमुळे करोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

यामुळे तालुका प्रशासनाने पोलीस कर्मचार्‍यांसह अत्यावश्यक मनुष्यबळासह चेक पोस्ट लावून त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सर्व तहसीलदार यांना आदेश काढले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts