अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- चोरीच्या घटना दररोज होतात मोठा मुद्देमाल चोरीस गेल्याचे ऐकवयास मिळते. परंतू देवळाली प्रवरात गुरवारी मध्यराञी 2 वाजता अज्ञात चोरट्यांनी जालिंदर सुदाम भांड यांचे अवधुत मेडीकल दुकानाचे शटर तोडून चोरी केली.
या चोरीत चोरट्यांनी मेडीकल मधील दोन हजार रुपयांची चिल्लर व 50 ते 60 निरोध पाकीटे चोरुन नेल्याने चोरट्यांनी अनोखी चोरी केल्याने चोरांनी केलेल्या चोरी बद्दल ऐकल्या नंतर नवल वाटावे अशीच चोरी चोरट्यांनी केली असल्याने पोलिसांनी माञ याबाबत गुन्हा दाखल करण्याचे टाळले आहे.
जवळच असेलेल्या लक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाचे मुख्य दरवाजाचे कुलपे तोडली पण चोरट्यांना दुसऱ्या दरवाजे कुलपे तोडता आली नसल्याने चोरट्यांचा मोठा डाव हुकला आहे. देवळाली प्रवरा येथिल सोसायटीच्या गाळ्यात जालिंदर सुदाम भांड यांचे अवधुत मेडीकल चे दुकान आहे गुरवारी मध्यराञी 2 ते 3 च्या दरम्यान अज्ञात पाच चोरट्यांनी कटरच्या सह्याने कुलपाचे कोंडे कापले तर टाँमीच्या सह्याने सेंटर लाँक उचकटुन मेडीकल दुकानात प्रवेश केला.
जवळच असेल्या लक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाचे मुख्य दरवाजाचे कुलपे तोडली पण चोरट्यांना दुसऱ्या दरवाजे कुलपे तोडता आली नसल्याने चोरट्यांचा मोठा डाव हुकला आहे. राञी 2 वाजता गस्तीवरील पोलिस चोरीच्या घटने पासुन अवघ्या दोनशे फुटावर होते.तेथुन ते टाकळीमियाँ येथे गस्तीसाठी गेल्यावर चोरट्यांनी डाव साधला.
अवधुत मेडीकल मध्ये चोरटे सुमारे एक तास उचका पाचक करीत होते.शेजारील श्रमिक कृषी सेवा केंद्रांच्या व मुथ्था ट्रेडर्सच्या सी.सी.टिव्ही कँमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे.पाच चोरटे कँमेऱ्यात दिसत असुन सुमारे एक तास मेडीकल मध्ये उचका पाचक करुन गल्ल्यातील दोन हजार रुपयांची चिल्लरवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
त्याच बरोबर औषधांची उचका पाचक करताना चोरट्यांनी चक्क 50 ते 60 निरोध पाकीटावर डल्ला मारल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. पण पोलिसांना सांगावे कसे असा प्रश्न दुकानदारा समोर पडला होता. प्रसिद्धीमाध्यमाच्या एका पञकाराने काय चोरीला काय काय गेले विचारले असता दोन हजार रुपये व औषधे असे सांगितले असता
कोणती औषधे विचारले असता मेडीकल दुकानदाराने सांगण्यास आढेवेढे घेतले असता गंमत म्हणून पञकारांनी निरोध चोरले का असे विचारले असता दुकानदाराने निरोधचा बाँक्स पञकारांसमोर ठेवला यातुन 50 ते 60 निरोध पाकीट चोरट्यांनी चोरुन नेले असल्याचे समजताच पञकारांनाही चोरट्यांबद्दल नवल वाटले.
जवळील लक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाचे मुख्य दरवाजाचे दोन कुलपांचे कोयंडे तोडले परंतू चोरट्यांना आतील दरवाजा उघडता आला नसल्याने चोरट्यांचा मोठा डाव हुकला आहे. चोरीच्या घटनास्थळी पोलिस नाईक जानकीराम खेमनर, पो.काँ.शशिकांत वाघमारे, सागर माळी आदींनी भेट देवून पाहणी केली.