Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथून एटीएम मशिन चोरून नेणाऱ्या चोरट्यांना अवघ्या काही तासांत जेरबंद करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.याबाबतची हकीगत अशी की दि. ३ ऑक्टोर रोजी पहाटे ३.४५ वा. च्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील राशिन शहरातील कर्जत भिगवन रस्त्यालगत दोशी पेट्रोलपंपाशेजारी हिताची कंपनीचे एटीएम मशीन ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली,
सदर घटनेबाबत दत्तात्रय मारुती परहर रा. विठाईनगर, कर्जत, ता. कर्जत यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी पोका, धस व होमगार्ड केदारी यांना करपड़ी फाट्याजवळ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.
माढा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही इसम लोंढेवाडी गावचे शिवारात एटीएम मशिन गॅसकटरने कट करून पैसे काढत असलल्याची माहिती मिळाल्याने माढा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी गेले असता, एटीएम चोर पिकअपसह पळू लागले,
पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून स्थानिक नागरिकांच्या मदतीने अविनाश मारुती ठंडे रा. उंडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापुर, सतीश शहाजी खांडेकर रा. वडनेर ता. परांडा, जि. सोलापुर, महादेव नागेश उर्फ नागनाथ सलगर रा. उडेगाव, ता. बार्शी जि. -सोलापुर, अशा ३ आरोपी माढा पोलीसांनी पकडले.
सदर आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी राशिन ता. कर्जत येथील एटीएम मशिन चोरी केल्याने कबुल केले. त्यांच्याकडे सदर एटीएम मशिनमधील चोरलेल्या रकमेपैकी ३ लाख ११ हजार ११० रुपये मिळुन आले.
या वेळी गुन्ह्यात वापरलेला ४ लाख रुपयांचा पिकअप, ५ लाख रुपये किमतीचे एटीएम मशिन असा एकूण १२ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पो. उप निरी. सालगुडे पोकॉ. वैभव गांगडे हे करत आहेत.