अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- रविवारी रात्री चोरट्यांनी पाईपलाईन रोडवरील तागड वस्ती येथे असलेल्या पुरातन हनुमान मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे.
गेल्या तीन वर्षापासून मंदिरातील दानपेटी उघडली गेली नव्हती त्यामुळे या दानपेटीमधील लाखो रूपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्या, घरफोडी, वाहन चोरीच्या घटना घडत आहे. तोफखाना पोलीस या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहेत.
तागड वस्ती येथील हनुमान मंदिर पुरातन आहे. पाच वर्षानंतर ही दानपेटी उघडली जाते. या दानपेटीच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरण करायचे होते.
परंतु चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेले असल्याचे पुजारी रविंद्र वामन पाटील यांनी सांगितले. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.