अहमदनगर बातम्या

‘ह्या’ कारणामुळे झाला संग्राम जगताप यांच्या कारचा अपघात ! वाचा पहाटे नक्की काय घडलं ???

Ahmednagar News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

यातून ते आणि त्यांचा चालक सुखरूप बचावले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जगताप यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.

मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसाठी रात्रीच मुंबईला त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून रवाना झाले होते. ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते.

एका ठिकाणी तिसऱ्या लेनमधून जाणारी एसटी बस लेन बदलून अचानक जगताप यांच्या वाहनासमोर आली. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही.

त्यामुळे ती बसवर मागील बाजूने धडकली.या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही.

अपघाताची माहिती कळताच पोलिस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलविण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts