ही तर केवळ सुरूवात आहे’ प्रा. राम शिंदे यांची आमदार रोहित पवार यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते. छाननीत राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाला असताना आ. रोहित पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला.

त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. मात्र निवडणूक झाली तर आता दारूण पराभव होईल, या भीतीने आ.पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज माघे घेतला.

हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरूवात झाली आहे. असे टीकास्त्र माजी मंत्री व प्रदेशउपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी आ.राहित पवार यांच्यावर सोडले.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवा संस्थेच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते,

तर राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता.

त्यामुळे भोसले यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. पर्यायाने भाजपच्या जगन्नाथ राळेभात यांचा एकमेव अर्ज राहील्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

ही निवडणूक माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली होती. अन् त्यात त्यांनी बाजी मारल्याने तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts