Ahmednagar News : छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांमधून या घटनेचा निषेध करण्यात आला, परंतु भाजपावाल्यांनी निषेध म्हणून एक शब्दाने तरी निषेध व्यक्त केल्याचे कुठे ऐकिवात आले नाही. भाजपाची यंत्रणा संपूर्ण भ्रष्टाचारी झालेली आहे, त्यामुळे या घटनेचा साधा निषेधसुद्धा भाजपाने केलेला नाही. अशी टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.
पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राची मान शरमीने खाली गेलेली आहे. प्रत्येक शिवप्रेमीच्या मनाला कुठेतरी ठेच लागली आहे व त्याचा उद्रेक म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्लयावर आठ महिन्यापूर्वी बसविण्यात आला होता परंतु निकृष्ट काम झाल्यामुळे तो पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याची घटना घडल्यामुळे राज्य सरकार विरोधात राज्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपोषणाच्या वेळी राहुरी पाथर्डी नगर मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी व विविध संघटनांनी येऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी महायुती सरकारवर आमदार तनपुरे चांगलेच कडाडले. ते म्हणाले की ज्या छत्रपतींचा स्वाभिमान आपल्या अंगात बाळगावा व त्याच छत्रपतींची अशी झालेली दुर्दशा कुठेतरी मनाला वेदना देऊन जाते म्हणून हे उपोषण मी केले आहे. या घटनेचा बोध सर्वांनीच घ्यायला हवा.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली ते म्हणाले की, पुतळा पडला म्हणून त्याच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते अरे हे काय उत्तर झाले का असा प्रश्न त्यांनी यावेळी केला.
व ज्या ठेकेदाराकडे हे काम होते त्या ठेकेदारावर अजून पर्यंत कुठलीच कारवाई झालेली सकाळपर्यंत तरी मला समजली नव्हती. आता दिलगिरी करून त्याचा उपयोग काय होणार असल्याचाही सवाल आमदार तनपुरे यांनी उपस्थित केला.
विरोधकांची किव करावीशी वाटते.आजच मी पेपरमध्ये वाचले की राहुरी कारखान्याचे नाव बदलून माझ्या आजोबांचे नाव दिले, या भाजपच्या कार्यकर्त्यांना नियम कायदे तोडून काम करण्याची सवय असल्यामुळे भाजपाचा काळामध्ये सगळे नियम पायदळी तुडवून नियंत्रणा कामाला लावायची अशी पद्धत आहे.
कुठलीतरी काही प्रेस कॉन्फरन्स घ्यायची चुकीची माहिती द्यायची आणि पेपरबाजी करायची अशी भाजपावाल्यांची पद्धत आहे. दुसरं काही सांगण्यासारखं नाही म्हणून पेपरबाजी करणे एवढेच एकमेव काम भाजपावाले आता करीत आहेत.