Ahmednagar News : सध्या पोलीस भरती सुरु आहे. यात मैदानी चाचणीत उमेदवारांना धावण्यासाठी बायपास वरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आता परत नगर शहरातील पत्रकार चौक ते एसपीओ चौक हा रास्ता बुधवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
महापालिका हद्दीत असलेला पत्रकार चौक ते एसपीओ (डीएसपी) चौक यादरम्यान रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे हा रस्ता बुधवारपासून (दि. २६) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक २६ जून ते १६ जुलै यादरम्यान पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसा आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काढला आहे.
पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. २६ जून पहाटे सहापासून ते १६ जुलै रात्री ८ वाजेपर्यंत पत्रकार चौकाकडून एसपीओ चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गान वळविण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग असे पत्रकार चौकाकडून एसपीओ चौकाकडे जाण्यासाठी नीलक्रांती चौक, दिल्ली गेट, नेप्ती नाका, आयुर्वेदिक कॉर्नर, जुना टिळक रोड, नवीन टिळक रोड, नगर-पुणे हायवे या मार्गे जाता येईल. तसेच कल्याण रोडला जाणारी वाहने नेप्ती नाका कल्याण रोडमार्गे इच्छित स्थळी जातील.