‘त्या’ वाहनांचा बुधवारी होणार लिलाव!

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करीत असताना अहमदनगर तालुक्यात पकडलेल्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

यामध्ये ज्या वाहनांच्या मालकांनी दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही, त्यांच्या जप्त करण्यात आलेल्या वाहनांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

बुधवार दि.१० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, अहमदनगर येथे हा लिलाव होणार असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

या लिलावात भाग घेऊ इच्छिणार्‍या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणार्‍या जंगम मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती यासाठी तहसील कार्यालय,

अहमदनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जास्तीत जास्त लोकांनी आणि संस्थांनी या जाहीर लिलावात भाग घेण्याचे आवाहन केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts