अहमदनगर बातम्या

Shirdi Rape : शिर्डीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, आरोपीस अटक

Shirdi Rape : तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील २१ वर्षीय विद्यार्थिनीवर वेळोवेळी शिर्डीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील एकास राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी अतिक पठाण (रा. करंजी, ता. कोपरगाव) याने जून २०२२ पासून मैत्री करून ऑक्टोबर २०२२ मध्ये शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देऊन मुलीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री अतिक पठाण हा फिर्यादी मुलीच्या घरासमोर आला असता फिर्यादीच्या आईने तू आमच्या घरी कशासाठी आला? तू माझ्या मुलीला का त्रास देतो? अशी विचारणा केल्याने तो पळून गेला. याबाबत पीडित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अतिक पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Shirdi Rape

Recent Posts