अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणी तिघांना अटक, दोघे अजूनही फरार

Ahmednagar News : अहमदनगर येथील ज्येष्ठ विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दोघे पसार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अक्षय विष्णु सब्बन (रा. दातरंगे मळा), चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडके मळा) असे अटक करण्यात आलेल्या दोघा इसमांची नावे असून, एक अल्पवयीन आहे. या घटनेत अक्षय व सनी जगधने हे दोघे पसार झाले आहेत.

७ ऑक्टोबर रोजी हेरंब कुलकर्णी हे त्यांच्या मित्रासमवेत मोटारसायकलवर जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेत ते जखमी झाले आहेत. तोफखाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी ३०७, ३२४, ३४१, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणाचे नगर जिल्ह्यासह राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वत्र निषेध नोंदवला जात असून, वा घटनेची तत्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,

उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, सपोनि. गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोसई, सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय गव्हाणे, दत्ता हिंगडे, पोना, लक्ष्मण खोकले,

विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, सचिन अडबल, संतोष खैरे, विशाल गवांदे, विजय ठोंबरे, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, संभाजी कोतकर तसेच तोफखाना पोलिस ठाण्यात पोसई, सचिन रणशवरे, पोहेकॉ. दत्तात्रय जपे, पोना. अविनाश वाकचौरे, शिरीष तरटे, सतीश भवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts