अहमदनगर बातम्या

नगरमध्ये कांद्याची तीन हजारी पार ! उच्च प्रतीच्या कांद्याला मिळाला ‘इतका’ भाव

Ahmednagar News: नगरच्या बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात सर्वात उच्च प्रतीचा १२ गोणी कांदा आवक झाली होती. या कांद्याला या हंगामातील सर्वात जास्त म्हणजेच ३६०० रुपये असा भाव मिळाला आहे. या कांद्याला मिळालेल्या या भावामुळे शेतकऱ्यांच्या अश्या पल्लवित झाल्या आहेत.

सोमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ४२ हजार ९१९ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ५०० ते ३१२५ रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे.

त्यामुळे ऐन खरिपाच्या पेरणीच्या काळात भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.

चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे आदीचा खर्च केला ऐन कांदा काढणीच्यावेळी कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. मात्र आता कांद्याच्या भावात सुधारणा झाल्या असून भाव वाढत आहेत.

आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी सुरु आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत होता. परंतु मागील काही दिवसांपासून कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत.

दरम्यान सॊमवारी नगरच्या बाजार समितीत ७८ हजार ३६ गोण्यात भरून आलेल्या ४२ हजार ९१९ क्विंटल कांद्याला ५०० ते ३१२५ रुपये असा भाव मिळाला. यातील १ नंबरच्या कांद्याला२४०० ते ३१२५, २ नंबरच्या कांद्याला १५०० ते २४००, ३ नंबरच्या कांद्याला ९०० ते १५००, तर ४ नंबरच्या कांद्याला ५०० ते ९०० असा भाव मिळाला.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts