अहमदनगर बातम्या

सशस्त्र दरोडेखोर अन् पोलिसांत थरार सहाजण जेरबंद : तलवारी, मिरची पूडसह घातक शस्त्रे जप्त

Ahmednagar News : तलवारी, लोखंडी टामी, मिरची पुड,नायलॉन दोरी अशी हत्यारे घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीत अन् नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात रात्रीच्यावेळी नगर – सोलापूर महामार्गावर वाळुंज गावच्या शिवारात असलेल्या पारगाव फाट्याजवळ चांगलाच थरार रंगला होता.

मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता या दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. साईनाथ तुकाराम पवार, आकाश गोरख बर्डे , विशाल पोपट बर्डे , नवनाथ तुकाराम पवार , अमोल दुर्योधन माळी व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. कुरणवाडी, ता.राहुरी) यांचा समावेश आहे.

वाळुंज शिवारात काही घातक शस्त्रे असलेली दरोडेखोरांची कुठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेले आहेत. अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी पथकाला तातडीने कारवाईसाठी पाठविले.

पथकाने वाळुंज शिवारात धाव घेत पारगाव फाट्याजवळ दरोडेखोरांचा शोध घेतला असता तेथे काहीजण अंधारात दबा धरून बसल्याचे दिसून आले. पोलिस पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले.

या पथकाने पाठलाग करून सर्व सहा जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे दोन तलवारी, लोखंडी टॉमी, मिरची पुड,नायलॉन दोरी व मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला. पकडलेले सर्व आरोपी हे सराईत दरोडेखोर आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts