अहमदनगर बातम्या

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या तपासासाठी पालकाने पोलीस ठाण्यासमोरच उचलले ‘टोकाचे’ पाऊल ..!

Ahmednagar News : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना काहीजण फूस लावून पळून नेण्याच्या घटना घडत आहेत. यातील काही मुलींचा पोलिसांना शोधणे शक्य होते. मात्र काही मुलींचा घटनेनंतर अनेक दिवस उलटून देखील तापास लावणे शक्य होत नाही.

काही दिवसांपूर्वीच संगमनेर तालुक्यातील देखील असेच एक मुलीला पळून नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. तसेच तिच्यावर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

त्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून त्या मुलीला देखील अशीच फूस लावून पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्या महाविद्यालयातील शिक्षिकांनी वेळीच धाव घेतल्याने हा गंभीर प्रकार टळला. त्यानंतर नगर शहरात व इतर ठिकणी देखील असेच काहीतरी आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप मुलीला घेऊन फरार आहे.

त्याचा तपास लावावा यासाठी मुलीच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दि.२६ जून रोजी हरेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळून नेल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मुख्य आरोपीला मदत करणाऱ्यास अटक केलीआहे . तसेच त्याची मोटारसायकल व मोबाईल जप्त केला आहे. मात्र, यातील मुलगी व मुख्य आरोपी हे अद्याप पोलिसांना सापडत नाहीत.

पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील जेजुरी, शिर्डी, दौंड या ठिकाणी पथक पाठवून तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मिळून आला नाही. इतके दिवस झाले मात्र अद्याप आरोपी व मुलगी सापडत नसल्याने हातास झालेल्या त्या मुलीच्या पालकाने दि.२ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यासमोर डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts