अहमदनगर बातम्या

प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका : आ. तनपुरे

Ahmednagar News : जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळा नगर रस्त्याच्या कामास विलंब करणाऱ्या राज्यातील विद्यमान सरकारच्या काळात प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही शोकांतिका असल्याची टिका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

येथील नगर-मनमाड रस्त्यावरील मुळा डॅम फाट्यावर काल मंगळवारी (दि.९) रस्ता रोको आंदोलन प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष मच्छिद्र सोनवणे, तालुका उपाध्यक्ष जालींदर अडसुरे,

वरवंडीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब वाघमारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके, रवींद्र आढाव, सुरेश निमसे व डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक अॅड. कचरु चितळकर, राजू साबळे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे,

पंढरीनाथ पाटोळे, रघुनाथ उगले, बाबासाहेब सोनवणे, तुकाराम अडसुरे, त्रिंबक अडसुरे, अनिल माने, अशोक बकरे, विठ्ठल डव्हाण, रामदास माने, अशोक लांडगे, मुळानगरचे उपसरपंच सलीम शेख, ज्ञानेश्वर बाचकर, ताहाराबादचे उपसरपंच पप्पू माळवदे, खडांबे बुद्रुकचे सरपंच कैलास पवार आदी प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मुळा डॅम फाटा ते मुळा नगर पर्यंतचा रस्ता हा अतिशय खराब होऊन मुळा धरण येथे जाणारे नागरिक शेतकरी, पर्यटक यांची गैरसोय होत होती. हा रस्ता करावा, यासाठी अनेकांनी अडचणी, प्रश्न मांडले व आमदार होताच या भागाने भरपूर साथ दिल्याने हा प्रश्न प्राधान्याने हाती घेऊन हा रस्ता जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील असल्याने तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून मंजूर करून मान्यता मिळाली त्यासाठी ५ कोटी रुपयाचा निधीही मंजूर झाला होता.

दरम्यानच्या राज्यातील सत्तेवरील महाविकास आघाडीचे सरकार गेले व सत्तेवर महायुतीचे सरकार आले. सत्तेवर आलेल्या सरकारने या ८ किमीच्या रस्त्याच्या कामाला २०२४ उजेडला, तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागते, ही अतिशय शोकांतिका असून राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाणिव पाहिजे, अशी टिका आमदार तनपुरे यांनी केली.

यावेळी तहसीलदार चंद्रजित रजपूत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता पाटील व पारखे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे उपस्थित होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक आबासाहेब वाघमारे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जालिंदर अडसूरे, तालुकाध्यक्ष मच्छिद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, महेश उदावंत, किशोर पातोरे, ज्ञानेश्वर जगधने, विजय कदम, राजेंद्र पवार, शंकर पवार, रामनाथ कदम, बंटी अडसूरे, संजय अडसूरे, केशव अडसूरे, रशीद शेख, रामनाथ शिंगाडे, बाळासाहेब मोढे आदींसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

आंदोलन प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वांबोरी चोरीचे थकबाकीमुळे वीज पुरवठा तोडण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याचे सरकार सांगते अन् दुसरीकडे मात्र जिरायत भागातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केले तरीही या थकबाकी पोटी मागील महिन्यात दिड लाख रुपये भरले होते. आताही शेतकऱ्यांनी पैसे जमा करून १ लाख रुपये भरले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts