आज १७५ रुग्णांना डिस्चार्ज तर २४८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार ५६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६२२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ आणि अँटीजेन चाचणीत १२५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, राहुरी ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३६, अकोले ०७, कर्जत ०७, कोपर गाव ०५,

नगर ग्रामीण ०६, नेवासा ०६, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहाता ०६, राहुरी ०३, संगमनेर १९, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १२५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०७, अकोले १०, जामखेड ०४, कर्जत ०६, कोपरगाव १९, नेवासा ०९, पारनेर ०२, पाथर्डी ११, राहाता १२, राहुरी ०३, संगमनेर ३२, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले १९, जामखेड ०५, कर्जत ०९, कोपरगाव ०७, नेवासा २१, पारनेर ०५, पाथर्डी १६, राहाता १८, राहुरी ०७, संगमनेर २३, शेवगाव ११, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:६१५६४

उपचार सुरू असलेले रूग्ण: १६२२

मृत्यू:९५३

एकूण रूग्ण संख्या:६४१३९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

माझेकुटुंब_माझीजबाबदारी

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts