अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४३ हजार ८८७ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ८८० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, जामखेड ०१, नगर ग्रामीण ०२,
नेवासा ०२, पारनेर ०७, पाथर्डी ०१, राहुरी १९, संगमनेर २२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, अकोले ०३,
जामखेड ०२, कर्जत ०३, कोपरगाव ०३, नगर ग्रा. ०८, पाथर्डी ०४, राहता ३३, राहुरी ०६, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४२ जण बाधित आढळुन आले. अकोले ०५,
कर्जत ०१, कोपरगाव ०४, नेवासा ०४, पारनेर ०२, पाथर्डी ०७, राहता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०४, श्रीगोंदा ०८ आणि श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले १५, जामखेड ०४, कर्जत ०७, कोपरगाव २०,
नगर ग्रा. २२, नेवासा २७, पारनेर २०, पाथर्डी ०६, राहाता ३५, राहुरी २२, संगमनेर ४८, शेवगाव २१, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,४३,८८७
उपचार सुरू असलेले रूग्ण:१८८०
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९८५
एकूण रूग्ण संख्या:३,५२,७५२
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)