अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील श्रीकांत शिवलींग तेलोरे (रा. कोल्हार ता. पाथर्डी) मृत्यू झाला असून नवनाथ मोहन पालवे (रा. कोल्हार) हे जखमी झाले आहेत.
नगर तालुक्यातील जेऊर ते चिंचोडी रोडवर उदरमल गावच्या शिवारात टाके वस्ती फाट्याजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर वरील चालकाविरूध्द (नाव, पत्ता माहिती नाही) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यविजय सुभाष तेलोरे (वय 25 रा. कोल्हार) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीकांत तेलोरे व नवनाथ पालवे हे दोघे दुचाकीवरून जेऊर ते चिंचोडी रोडवरून जात असताना उदरमल गावच्या शिवाराता टाकेवस्ती फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टर चालकाने धडक दिली.
या धडकेत श्रीकांत व नवनाथ जखमी झाले. त्यातील श्रीकांत यांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर चालक पसार झाला असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार रमेश थोरवे करीत आहेत.