अहमदनगर बातम्या

दुर्देवी घटना.. २ वर्षीय चिमुकल्याचा मालवाहतूक ट्रकच्या धडकेत मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवर मागे आईच्या कडेवर बसलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग मध्ये नोकरी असलेले बापूसाहेब बलमे हे आपल्या दुचाकीवरून पत्नी व मुला सोबत लोणी व्यक्ती कामासाठी गेले होते.

तेथील काम उरकून राहुरी फॅक्टरी येथे घरी परतत असताना गुहा शिवारात नगर-मनमाड मार्गावर पाठीमागून आलेल्या टी एन 30 बीएक्स 5499 या मालवाहतूक ट्रकने बलमे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात पाठीमागे आईच्या कडेवर असलेला चिमुकला पियुष(वय वर्ष २) जागीच ठार झाला. तातडीने चिमुकल्या पियुषचा मृतदेह साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने नर्सिंग होम येथे आणण्यात आला.

त्यानंतर राहुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघातात चिमुकल्या पियुषचा मृत्यु झाल्याने बलमे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात तामिळनाडू राज्यातील मालवाहतूक ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts