यंदा अधिकमास होता. त्यानंतर आला पितृपक्ष ! यामुळे विवाह सोहळे थांबले होते. अनेक विवाहेच्छुक तरुणांची मांदियाळी सध्या लग्नाला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात साधारण १५ हजार लग्न होण्याची शक्यता आहे.
तर राज्यात साधारण लाखभर किंवा त्यापेक्षा जास्त लाग्नसोहळे पार पडतील. नोव्हेंबर महिन्यात २७, २८ व २९ नोव्हेंबरच्या या तीन दिवसांच्या मुहूर्तावर तब्बल २१६ विवाह सोहळे पार पडले. शहरातील ४६ विविध मंगल कार्यालये व लॉन्स यासाठी बुकिंग होते. आता डिसेंबरमध्ये विवाहांचे १०, तर २०२४ मध्ये जानेवारी व फेब्रुवारीत २५ मुहूर्त आहेत. या काळात साधारण १५ हजार लग्नसोहळे पार पडतील असा अंदाज आहे.
लग्नाचा बदलला ट्रेंड :- सध्या विवाह सोहळे म्हणजे एक मोठा इव्हेन्ट तोही युनिक करण्याचे नियोजन सर्वांचे असते. लग्नाचा ट्रेंडच सध्या बदलला असल्याचे चित्र आहे. यात लग्नात पोल्ड फायर, स्टेज डेकोरेशन, प्रवेशद्वार एन्ट्रीसाठी विविध लूक आदींवर भर दिला जातो. अगदी मंडपात नवरदेव व नवरीची एंट्री देखील युनिक पद्धतीने कशी करता येईल याचे युनिक नियोजन केले जाते. यासोबतच जेवणाचा ट्रेंडही बदलला आहे. कधी काली केवळ पुरी , भाजी व एखादे गोड असे नियोजन असायचे . आता बदलत्या ट्रेंडनुसार चायनीज, कॉन्टिनेटल, इटालियन फूड, पंजाबी डिश, विविध चाट आयटम याना पसंती दिली जात आहे.
जिल्ह्यात उडणार १४ हजार ७८५ विवाहांचा बार :-यंदाच्या पुढील ८ महिन्यांच्या मुहुर्तावर १४ हजार ७८५ विवाहांचा बार उडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात कमी अधिक आकडा होऊ शकतो. शहरासह जिल्ह्यात ६६ लॉन्स व मंगल कार्यालये लग्नासाठी सजली
आहेत. नगर शहरात ४६ लॉन्स व मंगल कार्यालये आहेत. १३ तालुक्यांमध्ये प्रत्येकी २० ते २५ मंगल कार्यालये आहेत.
लॉन, कार्यालयांचे बुकिंग करण्यासाठी वधुपित्यांची धावपळ :-लग्नसोहळे जरी आता सुरु झाले असले तरी मागील तीन महिन्यापूर्वीच शहरासह जिल्ह्यातील बहुतांश मंगल
कार्यालयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. मुलीच्या वडलांची मंगलकार्यालये, लॉन बुकिंग करण्यासाठी धावपळ सुरु आहे.
जेवणाचे पदार्थही काळानुसार बदलले आहेत :-सध्या जेवणाचे पदार्थही कालानुरूप बदलले आहेत. आता सध्याच्या लग्नांत चायनीज, इटालियन पदार्थांना मागणी वाढली आहे. चायनीज कॉन्टिनेंटल, पंजाबी डिश, चार्ट आदी गोष्टी लोक पसंत करत आहेत. लग्नासाठी भरपूर पैसे खर्च करताना दिसत आहेत.
असे आहेत लग्न सोहळ्याचे मुहूर्त :-डिसेंबरमध्ये ६,७,८,१५,१७,२०,२५,२६, २९,३१ या तारखांना लग्नांचा मुहूर्त आहे. जानेवारीमध्ये २,३,४,५,६,८,१७,२२,२७,२८,३०,३१ तर फेब्रुवारीमध्ये १,२,४,६, १२,१३,१७,१८,२४,२६,२७, २८,२९० या तारखांना लग्नांचा मुहूर्त आहे. मार्चमध्ये ३,४,६,१६,१७,२६,२७,३० ३,४,६,१६,१७,२६,२ , एप्रिलमध्ये १,३,४,५,१८,२०,२१,२२,२६,२८ या तारखांना लग्नांचा मुहूर्त आहे.