अहमदनगर बातम्या

सोशल मीडियातून बदनामी करणारे दोन आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  नेवासे शहरातील मुस्लिम समाजाचे नेते आल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत अश्लिल व अक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने पुणे येथून दुसरा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

बदनामी नाट्यात आणखी चार आरोपी फरार आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण यांच्या चेहऱ्याचा वापर करत सोशल मीडियातून बदनामीप्रकरणी पठाण यांनी नेवासे पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून नेवासे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मानिक चौधरी व पोलिस फौजफाटा रवाना करून सायबर सेलच्या मदतीने पुणे येथून निखिल रविकिरण पोतदार याच्या मुसक्या आवळल्या.

याप्रकरणी पुन्हा आणखी दुसरा आरोपी पप्पू ऊर्फ तौसिफ गुलाम दस्तगीर (वय ३४, रा. रविवारपेठ पुणाे) अटक केली. आरोपीला नेवासे न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

याप्रकरणी आरोपी फुरकान अन्सारी (रा. बुधवार पेठ पुणे), बिलाल डमरा, सिब्बा, तसेच चौथा आरोपी हा नेवाशातील असिफ पठाण असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून अद्याप हे फरार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts