Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. विळद बायपास व पांढरीपूल अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. या दोन्ही अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे.
किरण रावसाहेब चिंधे (वय ३० रा. लिंक रस्ता, केडगाव) व एकनाथ आसराजी दहिफळे (वय ६५ रा. राघू, हिवरे, ता. पाथर्डी) असे मृतांची नावे आहेत. विळद बायपास, साईबनच्या पाठीमागे झालेल्या अपघातात किरण रावसाहेब चिंधे तर पांढरी पूल येथील अपघातात एकनाथ आसराजी दहिफळे हे ठार झाले.
विळद बायपास अपघात परकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सी आर पी सी १८४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
अपघाताच्या दूसऱ्या घटनेत पांढरीपूल येथील हॉटेल मिनाक्षी समोरून रस्त्याने पायी जात असलेल्या एकनाथ आसराजी दहिफळे (वय ६५ रा. राघू, हिवरे, ता. पाथर्डी) यांना वाहनाने धडक दिली.
या धडकेत जखमी झालेल्या दहिफळे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दहिफळे यांना मयत घोषित केले अशी माहिती मिळाली आहे.
मागील काही दिवसांत अहमदनगरमध्ये वाढलेली अपघातांची संख्या चिंताजनक आहे. यात दुर्दैवाने काही लोकांचे प्राणही गेले आहेत. रस्त्यांच्या दुर्दशा, परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चालणे, अति स्पीड आदी गोष्टी अपघातास कारणीभूत ठरत