अहमदनगर बातम्या

‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केल्याने गेले दोन लाख; सायबर पोलिसांंच्या सतर्कतेमुळे 90 हजार मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस दुसर्‍याला दिल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त होत आहेत.

केडगाव उपनगरात राहणार्‍या एका व्यक्तीने ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर बँक खात्याची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यातून एक लाख 98 हजार रूपये गेले. त्यातील 90 हजार रूपये परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

फसवणूक झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. केडगाव उपनगरात राहणारे मारूती दशरथ राजापुरे यांचीही अशीच फसवणूक झाली. त्यांना सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईलमध्ये ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

सायबर चोरट्याने राजापुरे यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस त्याच्याकडे घेतला. राजापुरे यांच्या बँक खात्याची माहिती चोरट्याकडे गेली. त्या माहितीच्या आधारे त्या चोरट्याने राजापुरे यांच्या बँक खात्यामधून एक लाख 98 हजार रूपये काढून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे राजापुरे यांच्या लक्षात येताच त्यांनी दीड ते दोन तासामध्ये सायबर पोलिसांकडे संपर्क साधला. तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी,

पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, अभिजित आरकल, राहुल गुंडू, दिगंबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे यांच्या पथकाने तांत्रिक विलेश्षण करत राजापुरे यांच्या खात्यातून गेलेले 90 हजार रूपये परत मिळून दिले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts