अहमदनगर बातम्या

पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड होणार

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- जिल्हा परिषद शिक्षण समितीची नुकतीच बैठक पार पडली आहे. यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या तक्रारी वाढत असून

पोषण आहाराच्या चौकशीसाठी आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची लॉटरी पध्दतीने निवड करून तपासणी करण्यात येणार आहे.

सोमवारी शिक्षण समितीची मासिक सभा झाली. यावेळी सभेला सदस्य राजेश परजणे, जालींदर वाकचौरे, मिलींद कानवडे, विमल आगवण, उज्वला ठुबे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

यात पोषण आहाराच्या तपासणीचा निर्णय घेण्यात आला. यास एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्यासह सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने सजगतने काम करावे, असे आदेश यावेळी देण्यात आले.

आगामी काळात शिक्षक व केंद्र प्रमुख यांची पुरस्कारासाठी निवड करतांना घेण्यात येणार्‍या प्रश्नावलीमध्ये संबंधीत शिक्षक अध्यापन करत असलेल्या वर्गातील अधिकाअधिक प्रश्नावलीचा समावेश करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

यासाठी जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना जास्तीजास्त सहभाग होता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts