अहमदनगर बातम्या

दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेले

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :-जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील दोन तरूणांनी राहुरी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला पळवून नेले.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहते.

दि. 10 मार्च रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील केंदळ येथून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणारे हे नेवासा तालुक्यातील आहेत.

त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला फोन केला असता आरोपी मुलांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

दाखल फिर्यादीवरून आरोपी विशाल भाऊसाहेब काकडे व रितेश भाऊसाहेब काकडे (दोघे रा. सोनई, ता. नेवासा) यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts