अहमदनगर बातम्या

अनाधिकृत वीज मीटर जोडून दिले अन् वायरमन लाचेत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन देण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.(Ahmednagar Crime)

श्रीधर परसराम गडाख (वय ४०) असे पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी कक्षात बाह्य स्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत होता.

लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने आज ही कारवाई केली. हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथील एका व्यक्तीने त्यांचे येथील राहते घरी विद्युत जोडणी घेणे करिता आईचे नावे कोटेशन भरले होते.

गडाख याने नवीन मीटर जोडणी मिळेपर्यंत अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन दिले, त्या मोबदल्यात त्याने तक्रारदार यांचेकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये गडाख याने पंचासमक्ष दोन हजार लाचेची मागणी केल्याचे

निष्पन्न झाले व सदरची रक्कम आज (दि. ३०) आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष दर्शन किराणा ॲंड जनरल स्टोअर, हिवरगांव पावसा येथे स्विकारली असता त्याला रंगेहाथ पकडले आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे,

पाेलीस अंमलदार रमेश चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts