नवीन नियमावली अंतर्गत कृषी विषयक दुकानांना सात तास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- महापालिका आयुक्त शंकरराव गोरे यांनी शहरातील किराणा दुकाने आणि भाजी विक्रेते यांना निर्बंध घातले होते. ते पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

15 मे पर्यंत हे आदेश होते. त्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सुधारित आदेश काढण्यात आला. महापालिकेने शहरातील निर्बंध काहीसे शिथील केले असून, किराणा दुकाने सकाळी अकरापर्यंत खुले करण्यास तसेच भाजी विक्रेत्यांना फिरून विक्री करण्यास मुभा दिली आहे.

विशेष म्हणजे खरिपाच्या तोंडावर शहरातील बी-बियाणे व कृषी साहित्य विक्री करणार्‍या दुकानांना बर्‍यापैकी मोकळीक देण्यात आली आहे. पशू खाद्य विक्री सकाळी सात ते अकरा, कृषी निविष्ठा विषयक दुकानांना सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

तसेच याचा पुरवठा करण्यासाठीच्या वाहतुकीस सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत वेळ दिलेली आहे. या शिवाय वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप, बॅँक, घरपोच गॅस वितरण हे नियमित सुरु राहणार आहे.

मात्र हे सर्व करताना कोरोना विषाणू नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यावयाची आहे. अन्यथा दंड आकारणी करण्यात येणार आहे. प्रत्येकास दंडाची रक्कम वेगवेगळी आकारण्यात आलेली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts