अहमदनगर बातम्या

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल; पिकांसह फळबागांचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- कोपरगाव शहरासह तालुक्यात हवामानात अचानक बदल झाल्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

या पावसाने शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील काढणी केलेली तसेच काढणीला आलेली हरभरा, ज्वारी, गहू पिके भिजल्याने तसेच फळ पिकांचा बहार जमिनीवर गळून पडल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ होऊन काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी, गहू , कांदा, मका व ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

मागील वर्षी खरिपात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके ही जोमात आहेत. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या पिकांना काहीसा फटका बसला आहे.

फळ पिकांचा, आंब्याचा झाडांचा बहार गळून पडला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts