अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून तोडफोड

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी आली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून तोडफोड करण्यात आली आहे.

पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय फोडले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पोटे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

जलजीवन योजनेंतर्गत सुरु असणारे कामे हे योग्य पद्धतीने सुरु नाहीत. एक दीड कोटीच्या योजना या असून केवळ एक दीड फुटावर पाईपलाईन टाकली आहे. आम्ही याना लाईव्ह पुरावे दिले आहेत.

तरी देखील जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झाली नाही. कार्यकारी अभियंता हे फोन उचलत नाहीत असा आरोप यावेळी प्रकाश पोटे यांनी केला. त्यांनी यावेळी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

पोटे यांनी जिल्हा परिषद सीईओंना देखील वार्निंग दिली. लवकरात लवकर आम्ही सांगितलेल्या गावातील कामाची पाहणी केली नाही तर यानंतर त्यांचे कार्यालय फोडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts