Ahmednagar News : तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी शेतकऱ्यांच्या समवेत काल सोमवारी (दि. १३) मतदानावेळी गळ्यात कांद्याची माळ घालून हातात दुधाची बाटली धरून मतदान केले व दुध व शेतमालाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले.
सरकारचे कांदा व दुधाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इतर शेतीमाल बरोबर आणू शकत नसल्याने उस्थळ दुमाला येथील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील मारुती मंदिरासमोरून सहकारी सोसायटी ते जिल्हा परिषद मराठी शाळा येथे मतदान बुथ केंद्र क्रमांक ६८ मध्ये कांद्याची माळ गळ्यात घालून व दुधात हाताची बाटली घेऊन निवडणूक अधिकारी समवेत मतदानाचा अधिकार बजावून त्यांच्याबरोबर उस्थळ दुमाला येथील पुंडलिक मोहिते, वासुदेव काळे, बद्रीनाथ चिंधे, हरी गायकवाड, अशोक गायकवाड, बापूसाहेब गायकवाड यांच्यासमवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
नेवासा तालुक्यातील या शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून व बगलात दुधाची बाटली धरून मतदान करायचे जाहीर केले होते. त्यानुसार शेतकरी तरुणांनी एकत्रित येऊन उस्थळ दुमाला येथे मतदानाला जाताना शेतकऱ्यांच्या कांदा व दूध दराची नाराजी प्रतिक म्हणून गळ्यात कांद्याची माळ व बगलात दुधाची बाटली घेऊन मतदान केंद्रावर गेले.
आचार संहिता असल्याने, “कांदा हा उष्णतारोधक असल्याने गळ्यात कांद्याची माळ घातली व दूध घालून आल्यानंतर कॅन कुठे ठेवा म्हणून बागलात अडकवला, असा युक्तीवाद यावेळी शेतकऱ्यांनी केला व शेतकरीविरोधी सरकारची भूमिका मतदान केंद्रावर जाहीर केली. एका शेतकऱ्याने पाण्याची बाटली २० रुपयाला आहे, त्यापेक्षा दुध स्वस्त असल्याने दुधाची बाटली जवळ बाळगली असल्याचा युक्तीवाद केल्याने याची चर्चा सर्वत्र होत होती.