अहमदनगर बातम्या

बाथरूमला जाऊन आलेल्या विवाहित तरुणीशी ‘ त्याने’ केले असे कृत्य…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar Crime :- बाथरूमला जाऊन आल्यानंतर परत घराकडे जात असलेल्या २१ वर्षीय विवाहित तरूणीला पाठीमागून कवळ मारली. तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालूक्यातील माहेगाव येथे १० मार्च रोजी घडली.

या बाबत सचिन चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील माहेगाव येथील एक २१ वर्षीय विवाहित तरूणी दिनांक १० मार्च रोजी सहा वाजे दरम्यान बाथरूमला गेली होती.

ती बाथरूम करून घराकडे परत येत असताना आरोपी तिच्या पाठीमागून आला. त्याने त्या विवाहित तरूणीला पाठीमागून कवळ मारली. नंतर तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करु लागला.

तेव्हा त्या तरूणीने जोरात आरडाओरड केली. तेव्हा तिचा पती तेथे पळत आला. त्याला येत असल्याचे पाहुन आरोपीने त्या तरूणीला खाली पाडुन तिच्या अंगावर पाय देवून तेथुन पळुन गेला.

घटनेनंतर त्या तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन चव्हाण राहणार शेंदडगाव, ता. राहुरी.

याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेश भवार हे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts