Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे रामोशी समाजबांधवांची स्मशानभूमी असून ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत रस्ता करुन अतिक्रमण केल्याचा आरोप रामोशी समाजबांधवांनी करत हे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, यासाठी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे काल सोमवारी एकच खळबळ उडाली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील बाजार तळानजीक रामोशी समाजाची स्मशानभूमी आहे. या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने याठिकाणी रस्त्याचे काम करत असताना अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप रामोशी समाजातील महिला व पुरुष यांनी करुन काल सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यत ग्रामपंचायत हे अतिक्रमण काढत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यानी घेतला आहे.
यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड, विकास गायकवाड, लहुजी सेनेचे महाराष्ट्राचे सचिव संतोष भडकवाड, युन्नुस सय्यद, कैलास गायकवाड, यशवंत वाल्हेकर, मुकेश वाल्हेकर आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
याप्रसंगी विशाल शिरतार, प्रभाकर जेडगुले, सुभाष जेडगुले, पुंजा भडंकर, कृष्णा पवार, विकास भडकवाड, राहुल जेडगुले, दत्ता गोफने, शुभम बोऱ्हाडे, मयुर जेडगुले, संदीप बोऱ्हाडे, संकेत गपले, मारुती गोफने, सुकदेव शिरतार, शारदा गपले, बेबीताई चव्हाण,
ताराबाई मोरे, चंद्रभागा शिरतार, अनुसया जेडगुले, विशाल चव्हाण, हिराबाई शिरतार, हौसाबाई जेडगुले, लताबाई शिरतार, शिवनाथ गोफने, बाळासाहेब चव्हाण, रवी शिरतार, सुनीता जेडगुले, पुंजा जेडगुले, पुंजाबाई जेडगुले आदी उपोषणस्थळी उपस्थित होते.
काल सोमवारी सायंकाळपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने या उपोषणाकडे काना डोळा करुन कोणतीही दखल घेतली नाही. तसेच गावातील जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांनी देखील या उपोषणकर्त्याची भेट न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.