अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- जे झाले ते झाले मात्र आता मला आता कोणाची खेळी कशी हे निट समजले आहे. त्या जरी जुन्या खरोखरच्या क्रिकेटमधल्या खेळाडु असल्या तरी मी पण शालेय जिवनात क्रिकेट संघाचा कर्णधार होतो.(MLA Monika Rajale)
त्यामुळे आता आगामी स्पर्धेत सावध खेळी करत आपणच मँच जिंकणार असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे यांनी आमदार राजळे यांचा नामउल्लेख टाळत त्यांना आव्हान दिले.
आमदार मोनिकाताई राजळे व अँड. प्रतापराव ढाकणे यांच्या वतीने तालुक्यात सध्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजळे मैदानात उतरुन क्रिकेटमधला बाँल टोलवतात आणि लगेच दोन दिवसात अँड.प्रतापराव ढाकणे मैदानात उतरले आहेत.
राजकीय लढाई सध्या क्रिकेटच्या मैदानातुन सुरु आहे. मी आता सावध झालो आहे आणि नाँटआँउट राहण्याचे कसब मला चांगलेच उमगले आहे असे ढाकणे यांनी सांगितले आहे.