Ahilyanagr News:- राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती व वीस तारखेला निवडणुकीसाठीची आवश्यक मतदान प्रक्रिया देखील पार पडली व आता उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
परंतु या निवडणुकीच्या कालावधीत मात्र जुन्नर तालुक्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक मात्र रखडली व ती लांबणीवर पडली.
त्यामुळे आता नवीन सरकारची स्थापना झाल्यानंतर या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडेल व त्यानंतर रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
काय आहे यावर्षी कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती?
जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी या हंगामामध्ये चांगला पाऊस त्याला परंतु तरी देखील कुकडी प्रकल्पांतर्गत धरणामध्ये 15 ऑक्टोबर 2024 अखेर जेमतेम 26.745 टीएमसी म्हणजेच 90% इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.जर मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितले तर यामध्ये एक टक्का उपयुक्त पाणीसाठा मात्र कमी झाल्याची स्थिती आहे.
यावर्षी जुन्नर तालुक्याच्या पूर्व आणि मध्य भागाच्या तुलनेमध्ये कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे माणिक डोह व पिंपळगाव जोगे धरणात शंभर टक्के पाणीसाठा होऊ शकला नाही.आता नवीन सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर रब्बीच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात येणार असल्यामुळे सात तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता नवीन सरकार कधी स्थापन होणार याकडे लागून राहिले आहे.
कुकडी प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता 29.54 टीएमसी आहे. कुकडी प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून बघितले तर जवळपास जुन्नर, आंबेगाव तसेच शिरूर,पारनेर, कर्जत तसेच करमाळा आणि श्रीगोंदा या सात तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य कुकडी प्रकल्पातील पाणी साठ्यावर अवलंबून असते.
जवळपास या सात तालुक्यातील एक लाख 42 हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामातील शेती पिकांच्या सिंचनाकरिता डिसेंबर महिन्यामध्ये कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडले जाते. सध्या साधारणपणे रब्बी हंगामातील कांदा व गहू या प्रमुख पिकांची पेरणी व लागवडीचे कामे सुरू आहेत.
कुकडी प्रकल्पाला सात तालुक्यांना जोडणारे सुमारे 623 किलोमीटर लांबीचे कालवे असून रब्बीच्या पहिल्या आवर्तनाकरिता दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान 8:30 ते 9 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो व त्यानंतर जे काही पाणी शिल्लक राहते ते उपलब्ध पाण्याचा विचार करून शेती पिकांसाठीचे दुसरे व उन्हाळी आवर्तनाचे नियोजन केले जात असते.
साधारणपणे या प्रकल्पातून तीन आवर्तने शेती सिंचनाकरिता व परिस्थितीनुसार पिण्यासाठी उन्हाळी एक आवर्तन अशा पद्धतीचे नियोजन असते.