अहमदनगर बातम्या

हेच का मनपा आयुक्तांचं फ्लेक्समुक्त शहराचं धोरण ? किरण काळे यांनी साधला निशाणा

अहिल्यानगर : नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेक्समुक्त करणार असल्याचं धोरण जाहीर केलं. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाईल असे सांगितलं. मात्र काही तास उलटले नाही तोच काँग्रेसने मनपाच्या गलथान कारभारावर सवाल उपस्थित केला आहे. प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या राजकीय अनधिकृत फ्लेक्स वरून हेच का मनपा आयुक्तांचं फ्लेक्समुक्त शहराचं धोरण ?, असा जाहीर सवाल करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निशाणा साधला आहे.

काळे म्हणाले की, शहराचं बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण होत आहे. हे थांबवत शहर स्वच्छ केल पाहिजे. मनपान जाहीर केलेल्या धोरणाच आम्ही काँग्रेसकडून निश्चितपणे स्वागत करतो. मात्र मनपाच धोरण हे सर्वांसाठी समान नसून सत्ताधारी राजकीय पक्षांना यातून सूट देण्यात आली आहे. म्हणूनच इतर राजकीय पक्ष तसेच व्यावसायिक जाहिरातींचे फलक मनपाने काढले खरे. मात्र काहींना यातून मनपाने सूट दिली आहे.

काळे पुढे म्हणाले की, आयुक्तांनी सांगितलं होतं की इथून पुढे शहरात फ्लेक्स लावण्यापूर्वी मनपाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. परवानगीचा क्रमांक संबंधित फ्लेक्सवर छापावा लागेल. तो न छापता फ्लेक्स लावला गेल्यास फ्लेक्स छपाई करणाऱ्या प्रिंटर्सवर देखील गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांचे फ्लेक्सवर फोटो, नावे आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील. आता मनपा या राजकीय फ्लेक्स बाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमक दाखवणार काय ?, असा जाहीर सवाल किरण काळे यांनी आयुक्त डांगे यांना केला आहे.

पुतळ्याचे काम तात्काळ पूर्ण करा : किरण काळे यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच स्मारकाचआणि पुतळ्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या ठिकाणी फ्लेक्सचा बाजार भरला आहे. मनपाने ही जागा तात्काळ फ्लेक्समुक्त करत रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे.

नाट्यगृहा बाबत आश्वासने नको कृती हवी : फ्लेक्सबाजीच्या छायाचित्रात मागे मनपाच्या प्रलंबित नाट्यगृहाचा भगनावस्थेतील सांगाडा दिसत आहे. काँग्रेसने यापूर्वी देखील पोलखोल करत या ठिकाणी तळीरामांच्या भरलेल्या अड्याचं ओंगळवाण चित्र मनपा समोर मांडलं होतं. मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कालच या जागेची पाहणी शहराच्या लोकप्रतिनिधींनी करत लवकरच हे काम पूर्ण होईल असे म्हटले होते. यावर निशाणा साधताना किरण काळे म्हणाले की, काम लवकर होईल असं आजवर लोकप्रतिनिधी मागील सुमारे सात ते आठ वर्षांपासून सांगत आहेत. आश्वासन नको कृती करा. नाट्य, साहित्य, संगीत कलाकार आणि रसिकांची मागणी पूर्ण करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा जाहीर इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare

Recent Posts