अहमदनगर बातम्या

निळवंडे प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील निळवंडे येथे प्रवरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या निळवंडे धरणाचे २०१४ पर्यत जवळपास १३ टक्के खोदकाम आणि ८.२३ टक्के भराव काम झाले होते.

महाविकास आघाडी शासनाने या प्रकल्पाला मोठया प्रमाणावर आर्थिक निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत २६ लाख ३८ हजार कुबिक मिटर खोदकाम आणि १४ लाख ५६ हजार क्यूबिक मिटर भराव काम झाले.

त्यामुळे निळवंडे धरणाचे काम वेगाने पूर्ण होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात नगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या चालू असलेल्या कामांचा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी आढावा घेण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, विशेष प्रक्पल्प, पुण्याचे मुख्य अभियंता एस. टी. धुमाळ, अहमदनगरचे अधिक्ष्‍ाक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ. रा. नाईक, नाशिकच्या अधिक्ष्‍ाक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक अ. ह. अहिरराव,

अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता का. ल. मासाळ, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नेार, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, कुकडी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदे,

लघू पाटबंधारे क्रमांक दोन विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, संगमनेर येथील उर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता लव्हाट, संगमनेर येथील उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता माने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सीना नदीची निळी रेषा आणि लाल रेषा आखण्यात आली असून त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे तसेच नदीपात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts