आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. खा. लंके म्हणाले, गावागावांतील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. आज मोठ्या संख्ये जनावरेदेखील या आंदोलनात आणण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मात्र प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप खा. लंके यांनी केला आहे.
सरकारने चार महिन्यांपूर्वी अनुदान जाहीर केले. त्यातील दोन टक्के लोकांना तरी पैसे मिळाले का? असा सवाल खा. लंके यांनी या वेळी उपस्थित केला. कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
आम्हाला आमच्या हक्काचे दर मिळाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. प्रशासनावर कोणाचा तरी दाबाव आहे. ते कसा काय या आंदोलनाकडे येतील. जिल्हाधिकारी मोठे साहेब आहेत. त्यांनी आलचं पाहिजे, अशी आमची मागणी नाही.
त्यांनी आलच पाहिजे यांच्याशी काही देणे घेणे नाही. मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही. मी २१ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहे. मात्र, त्यांच्यावर कोणांचा तरी दबाव असेल. दबाव कोणांचा आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्ही आता पाल ठोकून राहणार आहोत. उद्या जिल्हाभरातील शेतकरी या आंदोलनात येतील, असेही लंके यांनी म्हटले आहे.